मोहनलाल दोशी विद्यालयात एच.पी व्ही लसीकरण मोहीम संपन्न!
कार्यक्रमाचे उद्घाटन कागल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्या हस्ते झाले!

निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर (19)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात एचपीव्ही (HPV) लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन कागल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना ते म्हणाले “महिलांमध्ये होणाऱ्या गर्भाशयाच्या कर्करोगा पासून संरक्षण मिळविण्यासाठी ही लस फार महत्त्वाची आहे”
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांनी केले.विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या एकूण 323 मुलींनी एचपीव्ही लस घेतली.
कार्यक्रमाला विस्तारधिकारी साळुंखे आरोग्य सहाय्यक नासिर नाईक, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या डॉ. मयुरी कांबळे, आरोग्य सहाय्यक बाबुराव मांगोरे, सचिन पाटील शिक्षक प्रतिनिधी ए डी लकमले कर्मचारी प्रतिनिधी एस आर भोपळे यांच्यासह आर .एस. भोसले, आर .डी पाटील, एन.जे .खेबुडे, एस बी यादव, एस के कांबळे , आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. बुच्चे यांनी केले. तर आभार आर. डी. देसाई यांनी मानले.
कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.