देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथील बी कॉम भाग 3 या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात!

निपाणी नगरी अर्जुननगर प्रतिनिधी (19)
देवचंद कॉलेज अर्जुन नगर येथील बी कॉम भाग 3 या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 19 एप्रिल 2025 रोजी यशस्वीरित्या पार पडला. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या समारंभात अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील अनुभव सांगत कार्यक्रमात रंगत आणली होती.
याप्रसंगी कार्यक्रम प्रसंगी बोलताना वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. आर. के. दिवाकर यांनी भविष्यकालीन करिअर विषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की बी कॉम नंतर शिक्षण पुढे चालू ठेवता येते त्यामध्ये सी ए, सी एस, आय सी एम ए, एम बी ए असे अनेक पर्याय विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचप्रमाणे नोकरी मध्ये कंपनी, सरकारी नोकरी, खाजगी नोकरी असे वेगवेगळे पर्याय देखील असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे करिअर करत असताना आपले कुटुंब, आई वडील व घरातील फॅमिली अतिशय महत्वाची आहे, आपण त्यांनाही तितकेच मह दिले पाहिजे हे डॉ. दिवाकर यांनी आवर्जून सांगितले.
प्राचार्या डॉ जी डी इंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनात सध्याची स्पर्धा ही जीवघेणी आहे, कोणताही जॉब मिळविणे सोपे नाही आपण त्याप्रमाणे आपली वाटचाल केली पाहिजे. टी सी एस, इन्फोसिस, तसेच इतर अनेक कंपन्यांची जॉब संधी आपल्याला आहे. प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपणास चांगला जॉब मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी त्याअनुषंगाने प्रयत्न केले पाहिजेत हे त्यांनी आवर्जून सांगितले.
त्याचप्रमाणे माजी उपप्राचार्य डॉ. एम एम बागबान, डॉ. संतोष होडगे, श्री. किरण भोईटे, डॉ. संतोष अर्जुनवाडे, श्रीमती गीता पाटील, डॉ. एस एस रूपे वगैरे प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये श्री हरेल, ज्योती उपासे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन कुमारी प्रतिक्षा माळी यांनी केले आणि आभार सुरभी सुतार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह उपाध्यक्ष तृप्ती भाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास विभागातील सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते.