निपाणी नगरी वृत्तसेवा अर्जुननगर (21)
येथील मोहनलाल दोशी विद्यालायाच्या उपकरणास शालेय शिक्षण व साक्षरता विभाग अंतर्गत ‘अटल इनोवेशन मिशनद्वारे’ आयोजित विकसित भारत बिल्डथॉन 2025 या स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
समृद्ध भारत ही थीम घेऊन अमोघ अशोककुमार मोरबाळे व सहकारी विद्यार्थ्यांच्या गटाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, त्याबद्दल त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून नवी दिल्ली येथे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे यशस्वी विद्यार्थ्यांना जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीआशिषभाई शाह, उपाध्यक्षा डाॅ.प्रतिभाभाभी शाह डाॅ.तृप्तीभाभी शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका एस एम गोडबोले, डी बी बेनाडे यांच्यासह सर्व शिक्षक पालक यांचे मार्गदर्शन लाभले
Bharat Buildthon 2025 म्हणजे..
ही विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, तंत्रज्ञान आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आहे. या स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक विषयांवर प्रकल्प सादर करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देत “मेक इन इंडिया” आणि “डिजिटल इंडिया” संकल्पनांना बळ देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेमध्ये रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), पर्यावरण, स्मार्ट सोल्यूशन्स आणि सामाजिक उपक्रम अशा विविध विभागांचा समावेश असतो. विद्यार्थी संघाने तयार केलेल्या प्रकल्पांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजोपयोगी कल्पना मांडणाऱ्या संघांना विशेष गौरव दिला जातो. राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पारितोषिके आणि पुढील मार्गदर्शनाची संधी मिळते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, नेतृत्वगुण आणि टीमवर्कची भावना विकसित होत आहे.