निपाणी नगरी वृत्तसेवा संकेश्वर दि ४ (प्रतिनिधी)
कणगला राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ९.३० वाजता झालेल्या बाॅक्साईड ट्रक व टीव्हीएस स्कूटीच्या भिषण अपघातात भाऊ जागीच ठार तर गंभीर जखमी बहीणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टीव्हीएस स्कूटी क्रमांक केए २३/एच ६४४५ ला बाॅक्साईड ट्रक क्रमांक केए २२/ एए ६३७० ने पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात स्कूटी चालक अप्पासाहेब महालिंग लाटकर वय ( ६० ) राहणार कणगला जागीच ठार झाले.अपघातात गंभीर जखमी झालेली थोरली बहीण सुवर्णा सतगौडा पाटील वय ( ६२ ) राहणार मांगनूर यांचा बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी कणगला येथील अप्पासाहेब लाटकर हे आपल्या टीव्हीएस स्कूटी क्रमांक केए २३/एच ६४४५ वरुन थोरली बहिण सुवर्णा पाटील यांना म्हसोबा हिटणी मार्गे कणगलाकडे घेऊन जात असताना वाटेत कणगला राष्ट्रीय महामार्गावर बाॅक्साईड ट्रक क्रमांक केए २२/एए ६३७० पाठीमागून जोराची धडक दिल्याने अप्पासाहेब लाटकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाले.अपघातात सुवर्णा पाटील दोन्ही पाय गमावल्यांने त्यांना उपचारार्थ बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. संकेश्वर पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गणपती कोगनोळी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अपघाताची कसून चौकशी करत आहेत.