निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
निपाणी नगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. दिलीप राजाराम पठाडे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज येथील आंबा मार्केट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि ग्रामीण भागातून हितचिंतकांचा जनसागर लोटला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहकाररत्न युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील उपस्थित होते. त्यांनी दिलीप पठाडे यांच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरपालिकेचे सर्व आजी माजी नगराध्यक्ष, आजी माजी उपनगराध्यक्ष, विविध विषय समितीचे सभापती, सर्व सरकार नियुक्त नगरसेवक तसेच उत्तम पाटील गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, आर्थिक, साहित्य, क्रीडा आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पठाडे यांना दीर्घायुष्याच्या सदिच्छा दिल्या.
दिलीप पठाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका सौ. अनिता पठाडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांच्या प्रभागात मोठे आदराचे स्थान आहे. मागील टर्मला सुनिता पठाडे यांनी नगरसेविका म्हणून प्रभागाचे नेतृत्व केले होते, तर त्याच्या आधीच्या टर्मला स्वतः श्री. दिलीप पठाडे हे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. या दोन्ही कार्यकाळात पठाडे दांपत्याने नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आणि आपल्या प्रभागात रस्ते, पाणी, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सोडवत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली. केवळ सत्तेत असतानाच नव्हे, तर सत्ता नसतानाही दिलीप पठाडे हे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर असतात. सर्वसामान्य आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर राहिले असून, गरिबांच्या सुखा-दुःखात धावून जाणे हा त्यांचा सहजस्वभाव आहे. विशेषतः शहरावर आलेल्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, ते नागरिकांच्या मदतीसाठी थेट ग्राउंडवर उतरले असून आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य, औषधोपचार आणि आर्थिक मदत पुरवण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काची प्रचिती आजच्या सोहळ्यात आली. सकाळपासूनच त्यांच्या वॉर्डातील अनेक तरुण मंडळांचे पदाधिकारी, महिला भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सांस्कृतिक भवनात गर्दी करून पठाडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. श्री. दिलीप पठाडे यांचा केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही मोठा चाहतावर्ग आहे. विशेषतः त्यांचा ग्रामीण भागातील ‘व्हॉट्सॲप (WhatsApp) संपर्क’ आणि डिजिटल नेटवर्क अत्यंत मजबूत असल्यामुळे, आजच्या सोहळ्याला ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळाला. निपाणी परिसरातील अनेक ग्रामपंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी या सोहळ्याला हजेरी लावून पठाडे यांच्याबद्दलची आपली आपुलकी व्यक्त केली. दिवसभर चाललेल्या या सोहळ्याने दिलीप पठाडे यांच्या जनमानसातील अफाट लोकप्रियतेची पुन्हा एकदा साक्ष दिली. एक सजग सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी निपाणी शहराच्या विकासात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून, ‘डिजिटल वेब पोर्टल निपाणी नगरी. कॉम’ परिवारातर्फे लोकनेते दिलीप पठाडे यांना ५७ व्या वाढदिवसाच्या पुनश्च मनःपूर्वक शुभेच्छा!