निपाणी नगरी वृत्तसेवा (29)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व कर्नाटक राज्य संयुक्त सहकारी नियमित बेंगलुरु मधील नामवंत श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी. या संस्थेच्या वतीने बेळगाव येथील क्लब रोड हॉटेल इफा येथे दोन दिवसीय कर्ज मेळाव्याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख म.नी. प. पूज्य गुरु सिद्ध महास्वामीजी कारंजी मठ बेळगाव यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले तसेच संस्थेचे सरकार रत्न संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी, व चेअरमन किशोर बाली आणि मुख्य कार्यालयाचे संचालक व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे द्वीप प्रज्वलन करून वृक्षाला जल अर्पण करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की. बेळगाव सारख्या स्मार्ट सिटी मध्ये. उद्योग धंदे वाढीसाठी आर्थिक बाबीची गरज असते .ती गरज येथील उद्योग व्यवसायांना देऊन त्यांच्या गरजा व जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेतर्फे आर्थिक सहाय्य करून देशाच्या आर्थिक विकासासाठी चालना देण्याचा हा या संस्थेचा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच संचालक श्रीकांत परमणे यांनी आपल्या मनोगतात उपस्थित मेळाव्यातील उद्योजकांना मार्गदर्शन पर भाषण करताना म्हणाले की आज आपल्या संस्थेकडे 715 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण 480 कोटी केले आहे. तसेच संस्थेचे 60000 सभासद असून संस्थेने 5000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. संस्थेकडे आज 833 कोटी खेळते भांडवल असून संस्थेच्या 7 व मालकीच्या इमारती आहेत. दिनांक 31/03/2026 अखेर संस्थेस 10 कोटी 69 लाख रुपये निव्वळ नफा झाल्याचे सांगितले.
संस्थेचे विद्यमान चेअरमन किशोर बाळी सीए यांनी बेळगाव येथील महेश्वरी अंध शाळेला 25 हजार रुपये देणगी जाहीर केली. कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवर संचालक यांच्या हस्ते कारंजी मठ स्वामींचा भक्ती कनिके देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये जवळपास 400 ते 500 नव उद्योजक, व्यापारी, बिल्डर्स ,अभियंते ,डॉक्टर्स, शेतकरी यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी या उद्योजकांना कर्ज प्रक्रियेबद्दल व संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर माहिती देऊन सहकार्य केले.
कार्यक्रमांमध्ये मुख्य कार्यालयाचे संस्थापक चेअरमन व चेअरमन आणि उपस्थित संचालक यांच्या हस्ते बेळगाव चेंबर्स ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर राजेंद्र मुदगेकर, बेळगाव क्रीडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक सुनील पाटील तसेच नव हिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यळूळर चे चेअरमन व संचालक यांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये राजेंद्र मुदगेकर, युवराज हुलजी व नवीन सोसायटीचे संचालक यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. तसेच शेवटी करंजी मठ स्वामिनी उपस्थितांना आशीर्वचन केले.
कार्यक्रमास संचालक डॉक्टर एस आर पाटील श्रीकांत परमणे प्रताप पटनशेट्टी सुरेश शेट्टी महेश बागेवाडी ,अशोक लिगाडे ,राजेश पाटील, दिनेश पाटील ,संचालिका पुष्पा कुरबेट्टी. विजया शेट्टी सुवर्णा पटनशेट्टी, गुरुवार पेठ शाखा संचालिका उमा पाटील तसेच मुख्य कार्यालय सी ई.ओ. एस के आदन्नावर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी. चंद्रकांत हंबर. सुरज घोडके महादेव बडगीर. खडे बाजार ,टिळकवाडी, व महांतेशनगर बेळगाव येथील शाखांचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये उपस्थितांचे स्वागत, व प्रास्ताविक सोमलिंग माळवीनकट्टी व उपस्थितांचे आभार सुरज घोडके यांनी मानले.