निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
मराठा मंडळ बेळगाव संचालित मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 सालची विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक संपन्न झाली. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी म्हणून आपली उमेदवारी जाहीर केली होती. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी आपला निवडणुकीचा हक्क बजावला.
निवडणूक कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा घाटगे यांनी उद्घाटन करून आपला मतदानाचा हक्क बजावला. यानंतर सर्व वर्गवार विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र दाखवून मतदान केले. यामध्ये शिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून कार्य केले. सर्व निवडणूक आधुनिक डिजिटल प्रणाली द्वारे पार पाडण्यात आली. यासाठी समाजशास्त्र विभागाच्या शिक्षिका दिपाली पाटील व कलावती मेनसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लोकेश मुगळे व प्रांजळ झिनगे तसेच सहाय्यक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वर्धन चौगुले व रिद्धी चौगुले यांची निवड झाली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. निवडून आलेला सर्व विद्यार्थी प्रतिनिधीनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.