निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागिरथी बाई शाह कन्या शाळेची विद्यार्थिनी समृद्धी बडवे हीने रायबाग येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 44 ते 46 वजनी गटात तिने सहभाग घेतला होता.तिच्या या घवघवीत यशामुळे तिची आगामी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तिच्या या यशामागे तिची जिद्द, कठोर सराव आणि शाळेच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. समृद्धीच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन श्रीमान आशिषभाई शहा व सर्व संचालक मंडळाने तीचे अभिनंदन केले .शाळेचे मुख्याध्यापिका डॉ सौ.एस जे पाटील व क्रीडा शिक्षिका ए. डी. पाटील व तिच्या पालकांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.