निपाणी नगरी वृत्तसेवा..(12)
श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी या ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना स्वाभिमानाचा धडा शिकवणाऱ्या तसेच उत्तम संस्काराची नाळ जोपासणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ तसेच चला उठा ध्येय गाठे पर्यंत थांबू नका असा युवकांना संदेश देणारे महान योगी स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली
या ठिकाणी शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे, शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले, श्री निकेतन कन्नड मराठी माध्यम शाळेचे चेअरमन डॉ. अनिल ससे शाळेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. चंद्रकांत कुरुबेट्टी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले, तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील खडतर प्रवासाची यशोगाथा सांगितली.