निपाणी नगरी वृत्तसेवा..(8)
बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध व निपाणी तालुक्यातील नामवंत श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन व व्हाईस चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी व संस्थेचे चेअरमन किशोर बाळी यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या कर्मचारी पूजा इंगळे व शुभांगी गुमटन्नावर आणि प्रीतम चौगुले यांनी जागतिक महिला दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आजच्या धगधगीच्या जीवनात स्त्रिया आपली कौटुंबिक जबाबदारी पार पडून इतर क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत. काही स्त्रिया व्यवसायामध्ये तर काही स्त्रिया शेती व्यवसायामध्ये प्रगती करून यश संपादन करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज ही संकल्पना साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तसेच स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी मुलींची पहिला शाळा काढून स्त्री जातीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्यामुळे आज स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उत्तुंग अशी भरारी घेत आहेत. यामध्ये अंतराळवीर कल्पना चावला. पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यासारख्या महिलांनी आपला कर्तुत्वाचा झेंडा पार केला आहे. व उत्तुंग महिला यादीमध्ये आपले नाव कोरले आहे असे सांगितले.
कार्यक्रमास संचालक डॉक्टर एस आर पाटील, प्रताप पट्टनशेट्टी, श्रीकांत परमणे ,सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी अशोक लिगाडे, दिनेश पाटील ,राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेटी विजया शेट्टी. सुवर्णा पटनशेट्टी, सीईओ एस के आदन्नावर तसेच असिस्टंट सीईओ महेश शेट्टी भद्रश फुटाणे ,विद्या कमते, महादेव बडगीर सुरज घोडके, चंद्रकांत हंबर आणि आणि असंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.