निपाणी नगरी वृत्तसेवा..(8)
सीमा भागासह कागल ग्रामीण भागातील नदीकाठी असलेल्या शेतीपंपाची अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाली आहे. गेले आठवडा झाले अनेकांच्या मोटारी चोरट्याने चोरून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पोलिसांनी गस्त ठेवत चोरट्यांचा पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .
सध्या कडकडीत उन्हाचे दिवस आहेत .शेतीतील पिकांना वारंवार पाण्याची गरज भासते .शेतकऱ्याचे जीवन शेती वर अवलंबून असते .गेली आठवडाभर झाले. नदीकाठच्या शेती पंपांवर अज्ञात चोरटे डल्ला मारत आहेत ,त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शेती पंपांना रात्री आणि दिवसा अशा दोन सत्रांमध्ये लाईट वीज मंडळाकडून सोडली जाते.काही वेळा फॉल्टीच्या नावाखाली वीज दोन – दोन -तीन तास बंद असते. याचाही फटका शेतकऱ्याला सहन करावा लागतो आहे. वरून उन्हाची तिव्रता, खालून वीज मंडळाचा झटका, आणि त्यातच चोरट्यांचा वनवा .त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनाला फटका बसतो आहे.
रात्रीच्या वेळी शेतीपंपाना वीज शेतीसाठीच्या पुरवठाचे वेळापत्रक, चोरटे बरोबर हेरतात .विज नसल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी शेताकडे किंबहुना शेतीपंपा कडे फिरकत नाहीत. ही संधी साधून चोरटे सर्व साहित्या- निशी शेतीपंपाजवळ जाऊन पाण्याचा पंप खोलतात आणि त्यातील किंमती तांब्याची तार काढून घेऊन ते गायब होतात. दुसऱ्या दिवशी लाईट आल्यानंतर शेतकरी शेती पंप चालू करण्यासाठी जातात. त्यावेळी शेती पंपावर चोरट्याने चोरीचा हात मारल्याचे लक्षात येते .शेतकरी डोक्याला हात लावून मटकन खाली बसतो .अर्धा तास त्या बळीराजाला काही सुचत नाही .मन सुन्न होते. तरी प्रशासनाने यावर लवकरच तोडगा काढत बळीराजाला न्याय देण्याची मागणी सर्वत्र होत आहे.
“वर उन्हाची तीव्रता, खाली विजेचा झटका; त्यात चोरट्यांचा फटका, शेतकरी झाला हैराण खटका.”
आज शेतीपंपाच्या किमती पाहता सुमारे २५हजार रुपयां पासून पुढे आहेत .हे शेतकऱ्याच्या खिशाला न परवडणारे आहे. अगोदरच सूर्यनारायण तापले आहेत .वीज मंडळ झटका देते आहे. त्यातच चोरट्यानी पाण्याच्या मोटारींच्या चोरीचा सपाटा लावला आहे. आठवडा भरात पाच मोटारी चोरीस गेलेल्या आहेत.पोलीस खाते दक्ष रहावे व या शेतकऱ्यांना चोरीच्या शेतीपंपाचा तपास करून न्याय मिळवून द्यावा.
*जयसिंग घाटगे व दस्तगीर शेख*
प्रगतशील शेतकरी, करनूर, तालुका-कागल