निपाणी नगरी वृत्तसेवा..(9)
दि. फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. भा. शाह कन्याशाळेत एस. एस. एल सी विद्यार्थीनीचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री सदानंद झळके, देवचद कॉलेज, अर्जुनुनगर हे होते. कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शाह, संचालक श्री प्रसन्ना दोशी श्री आर. पी. बामणे शाळेची पंतप्रधान रोहिणी धनवडे आदी उपस्थित होते.
ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका डॉ.सौ एस.जे. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. सौ. ए. आर. पाटील, यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय करून दिला. यावेळी बोलताना श्री सदानंद झळके म्हणाले” आयुष्यात आपण नेहमीच आई, वडील, गुरुजन यांचा नेहमीच आदर ठेवला पाहिजे जीवणात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय ठरविले पाहिले व ते साध्य करण्यासाठी भरपूर प्रयत्न सातत्य आत्मविश्वास सहनशिलता आवश्यक आहे, अभ्यासाबरोबर आपण छंद, कौशल्य विकसित केली पाहिजेत आपल्या वागण्यातून बोलण्यातून संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. यशाला कोणताही शॉर्टकट नसतो त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक असते. यावेळी डॉ. प्रविणा शाह, सौ. एम. एम. चिकोडे तसेच इयता 9वी 10वी च्या विद्याथीनींनी मनोगते व्यक्त केली.
पाककला व वर्ग सजागट स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनीना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देवून गौरविण्यात आले, कार्यक्रमास यु .बी. नागावे, ए. डी. पाटील, व्ही. ए. निगवे एस. एस. घाटगे आर. आर. सुतार आर.व्ही. मधाळे, के. एन. मंगसुळी, जे. एम. शिंत्रे जे.सी. चंद्रकुडे के एस भादुले, पी एम कवाळे जयश्री कुरबेट्टी, पी आर पाटील, ओ. एम. कुलकर्णी आदी कार्यक्रमास उपस्थित होते. श्री. सी. एम. बाडकर यांनी सुत्रसंचलन केले व सौ. एस. आर. इराज यांनी आभार मानले.