निपाणी नगरी वृत्तसेवा..(14)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्री निकेतन कन्नड आणि मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी या ठिकाणी शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे श्री निकेतन शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी शाळेचे सेक्रेटरी श्री प्रदीप पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका भोसले सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक तर कर्मचारी यांच्या उपस्थित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छापर कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना गीत गाऊन तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री सदाशिव कुराडे व त्यांच्या सूविद्य पत्नी सौ कल्पना कुराडे उपस्थित होते.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा कार्यक्रमांमध्ये शाळेचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे तसेच प्रमुख पाहुणे श्री सदाशिव कुराडे सौ कल्पना कुराडे, श्री जितेंद्र कांबळे सौ नारे यांनी आपल्या मनोगतातून दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या आधुनिक जगामध्ये आपणास आता नव्याने पाऊल ठेवायचे असून आपल्या जीवनाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने करून येणाऱ्या सर्व समस्यांना सामोरे जात आपण देखील आधुनिक युगाचे पाईक असल्याचे सिद्ध करत आतापर्यंतच्या आपल्या शाळेने दिलेल्या विद्यारुपी देणगिणे या जगासमोर सजगपणे जाण्यासाठी तत्पर व्हावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेची विद्यार्थिनी कुमारी सृष्टी कोरे हिने केले.