निपाणी नगरी वृत्तसेवा .(17)
बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर व अग्रगण्य आणि निपाणी तालुक्यातील नामांकित श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुण्य दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन व व्हाईस चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी सर आणि चेअरमन किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर महास्वामीजी तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये बोलताना डॉक्टर सी बी कुरबेट्टी सर म्हणाले की सावित्रीबाई फुले या आपल्या देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला मुख्याध्यापिका होत्या तसेच त्या प्रबोधनाच्या पहिल्या किरण होत्या. त्यांनी अनेक हाल अपेष्टा तसेच अपमान सहन करून शिक्षणाची ज्ञानगंगा महिलांसाठी निर्माण केली. त्यामुळे आज स्त्रियांमध्ये एक नऊ चैतन्य मिळून आज स्त्रिया विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेत आहेत. सावित्रीबाई चा लढा हा केवळ अक्षरांचा नव्हता तर तो अखंड मानव जातीला माणूस पण मिळवून देण्याचा तो महासंग्राम होता. त्यामुळे सावित्रीबाईंचा विचार आज आपल्या कृतीत अमलात आणणे महत्त्वाचे आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागाचे सार्थक होईल असे सांगितले
कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या कर्मचारी बाबासाहेब मंगसुळे श्वेता कापसे, तसेच संमती भिकणावर, यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आपले विचार उपस्थित कर्मचाऱ्यांन समोर मांडले.
कार्यक्रमास संचालक डॉक्टर एस आर पाटील. श्रीकांत परमने, सुरेश शेट्टी ,महेश बागेवाडी, प्रताप पट्टनशेट्टी ,अशोक लिगाडे, दिनेश पाटील राजेश पाटील संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टनशेट्टी, सीईओ एस के आदन्नावर असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेस फुटाणे, विद्या कमते, महादेव बडगीर, सुजाता जाधव,चंद्रकांत हंबर. व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असिस्टंट सीईओ सुरज घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.