निपाणी नगरी वृत्तसेवा..(23)
मराठा मंडळ बेळगाव मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी शाळेचा दहावीचा निकाल 96 टक्के लागलेला आहे. शाळेची विद्यार्थिनी कुमारी सिमरा जमादार हिने 97. 76 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये पहिल्या येण्याचा मान मिळविला. तसेच कुमार समर्थ पाटील याने 97.44% टक्के गुण मिळवून शाळेमध्ये दुसरा येण्याचा मान मिळवला. तर 96 टक्के मार्क गुण घेऊन पूर्वा संग्राम चव्हाण ही शाळेमध्ये तिसरी आली. शाळेचा रिझल्ट 96 टक्के लागलेला आहे.
एकूण विद्यार्थ्यांच्या मध्ये 38 डिस्टिंक्शन 18 फर्स्ट क्लास 15 मुले सेकंड क्लास व इतर पास क्लासमध्ये उत्तीर्ण होऊन शाळेला उज्वल यश मिळवून दिलेले आहे.
वरील विद्यार्थ्यांना मराठा मंडळ बेळगावच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू, शाळेच्या प्रिन्सिपल सौ स्नेहा आर घाटगे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.