निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
M. L. P. S. आंबेडकर नगर निपाणी’ शाळेमध्ये आज ‘जागतिक पर्यावरण दिन’ अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. निसर्गाचे रक्षण करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शाळा परिसरात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हस्ते विविध प्रकारच्या औषधी व सावली देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संगोपन करण्याचीही जबाबदारी घेतली. झाडांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आणि पाणी बचतीचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ घेतली. “एक तरी झाड लावूया आणि पृथ्वीला हिरवीगार करूया,” असा संदेश देत मुलांनी पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण झाली असून, संपूर्ण शाळा परिसर पर्यावरणस्नेही संदेशांनी प्रफुल्लीत झाला होता.