निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
माणसाने नैसर्गिक शाश्वत जीवनशैली आत्मसात केली तर मानवी जीवन आनंदमय होईल व पर्यावरणाचा समतोल साधला जाईल तसेच जीवन जगताना मर्यादित गरजा ठेवल्या तर जीवन सुखी आणि समृद्ध होईल . बेसुमार वृक्षतोडीमुळे प्रदूषणाचा वेग प्रचंड वाढत आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ व व निसर्गाचक्रामध्ये अनियमित्ता निर्माण झाली आहे. व याचा थेट परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होत आहे यामुळे अनेक प्रजाती सुद्धा नष्ट होत चालल्या आहेत. याचा विचार करून मानवाने अपारंपारिक ऊर्जेचा वापर केला पाहिजे. डिजिटल युगात मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनचा वापर सुद्धा मर्यादित करणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळा यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. शाश्वत जीवनशैलीचा वापर केला तर मानवी जीवन सुखी व समृद्ध बनू शकते असे प्रतिपादन डी वाय पाटील,पर्यावरण विभागातील तज्ञ इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्रा. अभिजीत पाटील यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ आर. एम. साळुंखे यांनी केला यावेळी बोलताना ते म्हणाले की निसर्ग हा सर्व सजीवांचा गुरु आहे. आपण नैसर्गिक जीवनशैली चे अनुकरण केले पाहिजे. तरच आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो. यावेळेस विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अर्चना पाटील यांनी केले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य मेजर डॉ. अशोक डोनर उपस्थित होते. या कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिष भाई शाह उपाध्यक्षा डॉ.तृप्ती भाभी शाह संस्थेचे खजिनदार श्री सुबोध भाई शहा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस बी आरबोळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. पी ए मगदूम यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रा एन एस कोले यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.