निपाणी नगरी वृत्तसेवा (27)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेमध्ये नुकताच आषाढी एकादशीच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. प्रविणा शहा, संचालक प्रसन्न दोशी ,मुख्याध्यापिका डॉ. सौ एस जे पाटील, श्री आर पी बामणे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शालेय परिसर विठ्ठलमय आणि वारकरी संप्रदायाच्या रंगात न्हाऊन निघला होता
पालखी पूजन
दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. एस जे. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक भाषण केले . डॉ. प्रवीणा शाह व प्रसन्न दोशी यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती आणि पालखीचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी विठू नामाचा जयघोष केला पहिल्या सत्रात संगीत शिक्षक श्री. राजेंद्र कौंदाडे ,श्री. रणजीत कौंदाडे व तुलसी महिला भजनी मंडळ निपाणी यांचा भजनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
यानंतर शाळेच्या प्रांगणातून दिंडी सोहळ्यास दिमाखात सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. मुलींनी भगवे फेटे, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात झांज आणि मृदुंगाच्या तालावर पावले टाकत संपूर्ण शालेय परिसर दुमदुमून सोडला.
भजन व अभंग गायन
दिंडी सोहळ्यात चिमुरड्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचे सादरीकरण केले. ज्ञानबा-तुकाराम च्या गजरात, तसेच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, यांसारख्या प्रसिद्ध अभंगांचे आणि भजनांचे सामूहिक गायन विद्यार्थ्यांनी केले. या भक्तिमय सुरांनी उपस्थित सर्वांचे मन जिंकून घेतले.
संदेश व सांगता
याप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे आणि वारकरी संप्रदायाच्या संस्कृतीचे महत्त्व सांगितले. विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून एकता, समता आणि संस्कृतीचे संस्कार मुलांवर व्हावेत, हा यामागील मुख्य उद्देश होता. यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, पी. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी के.आर. चोपडे. पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या शेवटी सी एम बाडकर यांनी आभार मानले.