निपाणी नगरी वृत्तसेवा (8)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे योग्य आणि सुरक्षित ज्ञान मिळण्याच्या उद्देशाने, शाळेच्या वतीने नुकतेच एका विशेष ,”सायबर सिक्युरिटी’ (सायबर सुरक्षा)” मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ‘सायबर वॉरियर्स’ आणि प्रसिद्ध ‘क्विक हिल’ कंपनीच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका डॉ.सौ एस जे पाटील, विरेंद्र चान्सलरकर, आर पी बामणे,प्रशांत कुंभार आदी उपस्थित होते.
सायबर वॉरियर्स म्हणून देवचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यानींना सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक (Cyber Fraud), पासवर्ड सुरक्षा, मोबाईल मधील विविध ॲप आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण व प्रयोगात्मक माहिती दिली.
कार्यशाळे दरम्यान विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत मोठी जागृती निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व सायबर वॉरियर्स, फील्ड ऑफिसर नोडल ऑफिसर यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.एस जे पाटील व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमांतून मिळणाऱ्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, पी. आर. पाटील, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी के.आर. चोपडे. पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर, रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सी एम बाडकर यांनी आभार मानले.