निपाणी नगरी वृत्तसेवा (8)
पारस सौहार्द सहकारी संघ नियामित, बेळगाव यांच्या निपाणी येथील नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता अशोकनगर, निपाणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या नवीन शाखेचे उद्घाटन पद्मश्री डॉ. प्रभाकर बी. कोरे (माजी खासदार, कुलपती – केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च व केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ. शशिकला जोल्ले (निपाणी, माजी मंत्री), श्री. वीरकुमार पाटील (माजी मंत्री), आमदार श्री. अभय पाटील (बेळगाव दक्षिण) तसेच उद्योजक व काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष श्री. राजेश कदम उपस्थित राहणार आहेत.
पारस सौहार्द सहकारी संघ नियामित ही संस्था विश्वास, निष्ठा आणि समृद्धी या मूल्यांवर कार्यरत असून, निपाणी परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवीन शाखा सुरू करण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. संतोष पाटील यांनी निपाणी व परिसरातील नागरिक, सभासद, ग्राहक आणि मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.