निपाणी नगरी वृत्तसेवा (17)
पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार” येथील ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. एन. डी. जत्राटकर यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती व संयोजक डॉ. पांडुरंग भोसले यांनी आज ही घोषणा केली.
ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २१) सकाळी ११ वाजता कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. पाली- मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ पुरस्कार सदर पुरस्कार देण्यात येत आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. जत्राटकर यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.