निपाणी नगरी वृत्तसेवा (19)
कर्नाटकातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर आणि कर्नाटक राज संयुक्त सहकारी नियमित बेंगलोर मधील नामवंत व बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निपाणी या संस्थेच्या वतीने संस्थेचे जेष्ठ कायदे तज्ञ वकील श्री सुभाष पुरंदर उत्तरे यांनी 51 वर्षे वकील क्षेत्रात उत्तुंग व नेत्र दीपक न्याय सेवा बजावल्या बद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर एस आर पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन महात्मा बसवेश्वर सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे सहकार रत्न संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी सर चेअरमन किशोर बाळी. संचालक श्रीकांत परमणे, प्रताप पट्टनशेट्टी, सुरेश शेट्टी ,महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस के आदन्नावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, सुरज घोडके, महादेव बडगीर, चंद्रकांत हंबर व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिलीप गायकवाड यांनी मानले.