निपाणी नगरी वृत्तसेवा (20)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत आपल्या सांस्कृतिक परंपरेचा आणि निसर्ग प्रेमाचा प्रतीक असलेला ‘नागपंचमी’ सण नुकताच अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये सर्पाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका डॉ. सौ एस. जे. पाटील, श्री आर पी बामणे सर्पमित्र आशिष भाट आधी उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ सौ.एस जे पाटील यांच्या हस्ते नागाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजना नंतर शाळेच्या वतीने पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात त्यानी नागपंचमीच्या सणाचा मूळ उद्देश निसर्गातील जीवसृष्टीचा समतोल राखणे हा असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थीनींना आपल्या संस्कृतीची ओळख करून देत सणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सर्पमित्र आशिष भाट त्यांनी संवाद साधताना सांगितले की सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व नागाला आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असून शेतकरी मित्रा, उंदीर व उंदरा सारख्या उपद्रवी किटकांना खाऊन पिकांचे रक्षण करणारा साप हा पर्यावरण चक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.
सापां विषयीच्या अंधश्रद्धा सापांच्या दुधा बाबतच्या गैरसमजुती, सापांच्या अंगावर केस असणे, अंगात येणे किंवा इच्छाधारी साप असल्याच्या अनेक समजूती समाजामध्ये आहेत. भारतातील विषारी आणि बिनविषारी साप ओळखणे, साप चावल्यास घाबरून न जाता तातडीने करायचे प्रथमोपचार आणि वैद्यकीय उपचारांचे महत्त्व याविषयीची सविस्तर शास्त्रीय माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी सर्पमित्र आशिष भाट यांना सापां विषयी अनेक प्रश्न विचारले, ज्यांची त्यांनी अतिशय रंजक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. या संपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर पडली आणि त्यांच्या मनातील सापां विषयीची भीती दूर होऊन निसर्गाबद्दल आदर निर्माण झाला.
यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, पी आर पाटील ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, के आर चोपडे, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी . पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी,पद्मश्री उमाजे, पालक व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.