निपाणी नगरी वृत्तसेवा (24)
दि फिमेल एज्युकेशन सोसायटी संचलित, सौ भागीरथीबाई शाह कन्या शाळेत नुकताच कॅनरा बँकेच्या वतीने गुणवंत व गरजू विद्यार्थ्यिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा विशेष कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे खजिनदार श्रीमान अनिल कुमार मेहता, संचालिका डॉ. प्रवीणा शाह, संचालक प्रसन्न दोशी, कॅनरा बँकेचे सीनियर मॅनेजर श्री दर्शन लोहकरे, शाळेचे मुख्याध्यापिका डॉ. सौ.एस जे पाटील, श्री आर पी बामणे आदी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ एस जे पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कॅनरा बँकेच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले व बँकेने शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संचालिका डॉ. प्रवीणा भाभी शहा यांनी आपल्या मनोगतात सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून बँकेने जी मदत केली आहे, ती अत्यंत मोलाची असल्याचे सांगीतले.
शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावी वर्गातील प्रत्येकी एक अशा सहा गुणवंत व गरजू विद्यार्थिनींना जवळजवळ 24 हजार रुपये ही शिष्यवृत्ती देण्यात आली. व शाळेसाठी सहा फॅन देण्यात आले. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे मुलींच्या पुढील शिक्षणासाठी मोठा आत्मविश्वास मिळाला आहे.सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कॅनरा बँकेचे सिनियर मॅनेजर श्री दर्शन लोहकरे यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचा व भविष्यात उच्च अधिकारी बनण्याचे आवाहन केले.यावेळी यु बी नागावे, एम एम चिकोडे, एस आर ईराज, पी आर पाटील, ए डी पाटील,ए. आर. पाटील, व्ही. ए. निगवे, एस. एस. घाटगे, आर. व्ही. मधाळे, आर. आर. सुतार, के आर चोपडे, ओ. एम. कुलकर्णी, एस आर हवालदार सुभाष माळी . पी एम कवाळे ,ए एन साळुंखे ,सी ए इंदलकर रुपाली केरीमनी ,पद्मश्री उमाजे , पालक व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या . सी एम बाडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.