निपाणी नगरी वृत्तसेवा बोरगांव प्रतिनिधी (29)
“सहकार, विश्वास आणि ग्राहकसेवेच्या बळावर सातत्याने प्रगतीची वाटचाल करणाऱ्या बोरगाव अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी (मल्टीस्टेट) या नूतन वास्तूचे उद्घाटन 30 ऑगस्ट 2026 रोजी होत असून, हा सोसायटीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा टप्पा ठरणार आहे. बदलत्या काळानुसार बँकिंग क्षेत्रात होत असलेले परिवर्तन स्वीकारत आधुनिक सुविधा आणि ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य देत सोसायटीने उभारलेली ही नवी वास्तू म्हणजे केवळ इमारत नसून सोसायटीच्या प्रगतीची नवी ओळख ठरणार आहे.”
सहकार क्षेत्र हे विश्वासाच्या बळावर चालते आणि हाच विश्वास संपादन करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासो पाटील यांनी गेल्या तीन दशकापासून बोरगाव अर्बनच्या रूपाने सभासदांची विश्वासार्हता जपली आहे.
सहकार तत्वावर मे 1994 साली या सोसायटीची स्थापना करण्यात आली. संस्था चालविता असताना अनेक अडचणी आल्या. पण अडचणींवर मात करत तात्यासो पाटील यांनी जिद्द व प्रामाणिकतेच्या जोरावर कार्य केले. संघर्षा शिवाय यश नाही हे समजून श्री पाटील यांनी सतत संस्थेला उंच शिखरावर पोहोचण्याची जिद्द मनाशी बाळगल्याने ही संस्था आज कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात दिमाखात उभी आहे.
गेल्या 32 वर्षाच्या आपल्या वाटचालीत ग्राहकांचा विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती समजत सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार केला आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता, पारदर्शकता आणि ग्राहकांना वेळेत सेवा देण्याच्या भूमिकेमुळे सोसायटीने नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात एकूण 43 शाखांत द्वारे कार्यरत असलेल्या या सोसायटीत 24676 सभासद असून, 275 कोटींहून अधिक ठेवी आहेत. 231 कोटींचे कर्ज वितरण केले असून, 72 कोटींची एकूण गुंतवणूक केलेली आहे. 17 कोटी पेक्षा जास्त भाग भांडवल असून सोसायटीचे एकूण 312 कोटींवर खेळते भांडवल आहे. 500 कोटींच्या वर वार्षिक उलाढाल करून सोसायटी प्रगती प्रथावर कार्यरत आहे.
आज बँकिंग क्षेत्र झपाट्याने डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित होत आहे. ग्राहकांच्या अपेक्षाही बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नूतन वास्तू महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रशस्त जागा, नियोजनबद्ध कार्यालयीन व्यवस्था आणि आधुनिक सुविधांमुळे सोसायटीच्या दैनंदिन कामकाजाला अधिक गती मिळणार आहे.
कोणत्याही सोसायटीच्या यशामागे केवळ आर्थिक व्यवहार नसतात, तर ग्राहकांचा विश्वास आणि सभासदांचा सहभाग ही त्यामागची खरी ताकद असते. बोरगाव अर्बन संस्थेनेही ही बाब सातत्याने जपली आहे. ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, त्यांच्या आर्थिक गरजा समजून घेण्याची भूमिका आणि सेवा देताना ठेवलेली विश्वासार्हता यामुळे वाटचाल अधिक भक्कम झाली आहे. सहकार क्षेत्रातील वाटचाल व सहकार क्षेत्राचा अनुभवामुळे सोसायटीस विविध स्तरांवर गौरविण्यात आले आहे. कर्नाटक राज्य सहकार महामंडळ बेंगळुरू या महामंडळाकडून 2017 -18 सालाचा ‘उत्तम सहकार संस्था’ पुरस्कार तसेच 2018- 19 साली उत्तम सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. 2023 साली फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप सोसायटी पुणे यांच्यावतीने सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार व 2023-2024 सालाचा महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय बँको प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.
बदलत्या आर्थिक परिस्थितीत ग्राहक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि विविध घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बोरगाव अर्बन सोसायटी नूतन वास्तुत सज्ज आहे.
सहकारी बँकिंग व्यवस्था ही स्थानिक अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधाररचना आहे. स्थानिक नागरिकांच्या बचतीला योग्य दिशा देणे, गरजू घटकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि छोट्या-मोठ्या व्यवसायांना चालना देणे, या दृष्टिकोनातून बोरगाव अर्बन सोसायटीची नूतन वास्तूमुळे अधिक व्यापक बनणार आहे.
बोरगाव अर्बन सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनामुळे सोसायटीच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू होत आहे. भूतकाळातील अनुभव, वर्तमानातील आधुनिकता आणि भविष्याची विकासदृष्टी यांचा संगम या नव्या वास्तूतून पाहायला मिळणार आहे.विश्वासाची भक्कम पायाभरणी आणि प्रगतीची नवी वास्तू यांचा सुंदर संगम साधत बोरगाव अर्बन सोसायटी आता विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे.