निपाणी नगरी वृत्तसेवा (10)
नुकत्याच पार पडलेल्या बेळगाव येथे कर्नाटक सरकार ,जिल्हा पंचायत बेळगाव, युवा सबलीकरण आणि क्रीडा क्षेत्र बेळगाव, यांच्या वतीने डिव्हिजनल चीफ मिनिस्टर दसरा तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये निपाणी येथून सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेमध्ये 45 किलो आतील वजन गटांमध्ये समर्थ बबन निर्मले सुवर्णपदक पटकावले तर मुलींच्या गटात 65 किलो आतील गटांमध्ये सौम्या अशोक खोत या विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकावले यशस्वी विद्यार्थ्यांचे दिनांक 12 व 13 ऑक्टोंबर रोजी म्हैसूर येथे श्री चामुंडेश्वरी विहार स्टेडियम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय चीफ मिनिस्टर कप तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना तायक्वांदो चे प्रशिक्षक श्री बबन निर्मले यांची मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.