निपाणी नगरी वृत्तसेवा (6)
जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत निपाणी मराठा मंडळ हायस्कूलच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या जोरावर शाळेच्या कु. अनन्या काटकर व कु. तनुजा पाटील या दोन गुणवान विद्यार्थिनींची विभागीय (डिव्हिजन) पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्या संघाने निपाणी तालुका अंतिम फेरीत प्रवेश करत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात संघाने उपविजेतेपद मिळवत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या उल्लेखनीय यशामध्ये विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे सहाय्यक शिक्षक श्री. जे. आर. खपले सर यांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्र रघुनाथराव कदम तसेच शिक्षण समितीचे चेअरमन श्री. राजेश रघुनाथराव कदम यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.