निपाणी नगरी वृत्तसेवा (16)
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाचन प्रेरणा दिन ग्रंथप्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थित मुख्यध्यापिका सौ. एस एम गोडबोले यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले .
कु स्वराली सावंत, शाल्मली अंकोशे ,यांनी डॉ कलामांच्या आयुष्याचा प्रवास सुंदर शब्दात उलगडला. एस एम जाधव यांनी वाचन प्रेरणा दिनी सर्वांना शुभेच्छा देऊन वाचनाचे महत्त्व विशद केले. स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही आर पाटील यांनी केले तर प्रस्ताविक ग्रंथपाल व्ही आर दिवटे यांनी केले तसेचआभार यु एम सातपुते यांनी मानले. आरोग्य विभागा मार्फत *हातधुवा दिन* साजरा करण्यात आला एस एम चौगुले यांनी हाताच्या स्वछतेचे महत्व प्रात्यक्षिकासह पटवून दिले
याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर डी पाटील , आर एस भोसले, आर डी देसाई ,एस बी यादव ,ए व्ही तेली आदी मान्यवर उपस्थित होते.