निपाणी नगरी वृत्तसेवा (17)अर्जुननगर
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील इंग्रजी विभागातील प्राध्यापकांच्या *‘Digital English Language Education and Literature Exploration Device’* या उपकरणाच्या डिझाइनची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे नोंदणी झाली आहे. हे उपकरण भाषा शिक्षण, साहित्य अध्ययन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल संशोधन यांचा समन्वय साधून आधुनिक उच्च शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची क्षमता, सक्रिय सहभाग, चिकित्सक विचारशक्ती, सर्जनशीलता आणि आंतरविद्याशाखीय अध्ययनाची वृत्ती विकसित होण्यास प्रोत्साहन मिळू शकते.
या नोंदणी प्रमाणपत्रावर इंग्रजी विभागप्रमुख डॉ. आनंदी सदाशिव कांबळे, डॉ. दीपा मुत्ताण्णा मडिवाळ, श्री. विनायक शिवाजी वरुटे आणि श्रीमती स्मिता अविनाश पाटील यांची नावे आहेत.
महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह आणि सौ. डॉ. तृप्तीभाभी शाह यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले. या नोंदणीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांना प्रोत्साहन मिळाले आहे.