निपाणी नगरी वृत्तसेवा..(19)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम यांचे 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन श्री वेंकटेश मंदिर या ठिकाणी संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शांतिनिकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे होते. प्रमुख पाहुणे बाहुबली पार्श्वनाथ ब्रह्मचर्य आश्रमचे संचालक श्री महावीर पाटील होते. तर प्रमुख उपस्थिती प्रशालेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सी बी कुरबेट्टी श्री निकेतनचे चेअरमन डॉक्टर अनिल ससे, सेक्रेटरी प्रदीप पाटील, मुख्याध्यापिका सौ अलका भोसले, सर्व शिक्षक वृंद, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, कर्मचारी व पालक वर्ग सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अति उत्साहात साजरा करण्यात आला.
या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात प्रार्थना गीत व स्वागत गीत इयत्ता नववी व दहावीच्या मुलींच्या सादरीकरणाने केल. सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून सुरुवात केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ अलका भोसले यांनी केले अहवाल वाचन शाळेच्या शिक्षिका सौ माया कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महावीर पाटील यांनी आपल्या मनोगतात शाळा एक असं माध्यम आहे विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करत असतं असे विचार मांडले. डॉ. ससे म्हणाले सर्व पालकांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त केले. आंतर शालेय विविध स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश मिळवून शाळेचा नावलौकिक केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण सादर करून आलेल्या पालक वर्गाचे मन जिंकले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ अश्विनी खोत सौ नारे शाळेचे शिक्षक श्री जितेंद्र कांबळे सौ सुवर्णा खाडे सौ श्रीदेवी कुगे व सौ प्रिया पोळ यांनी केले. मुलांची वेशभूषा करण्यासाठी सौ अर्चना कुंभार श्रीमती उगारकर श्री अरुण शिंदे आणि कृष्णा ढाले यांनी पाहिले. कार्यक्रमाचे आभार सौ गीता जाधव यांनी मानले.
थोडक्यात महत्त्वाचं..
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम यांचे 21 वे वार्षिक स्नेहसंमेलन श्री वेंकटेश मंदिर या ठिकाणी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सर्व थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनेल “निपाणी डायरी”वर आज देखील आपण पाहू शकता. त्यासाठी @nipanidiary या युट्युब हँडलला भेट द्या.