निपाणीसह वार्ड नंबर 31 मध्ये निधीची कमतरता भासू देणार नाही- आ.शशिकला जोल्ले!
तहसीलदार प्लॉट येथे विविध कामांसाठी ८६.७६ लाखांचा निधी मंजूर! परिसराचा कायापालट होणार!

निपाणी नगरी प्रतिनिधी (6)
निपाणी नगरीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवून मला विजय मिळवून दिला आहे. त्या शिदोरीचा अजून देखील माझ्याकडून विसर पडलेला नसून त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणून मी आज आपल्या समोर वॉर्ड नंबर 31 मधील विकास कामांचा प्रारंभ करण्यासाठी उभी असून निपाणी सह वार्ड नंबर 31 च्या विकासासाठी ही कटिबद्ध असून माझ्या मतदार संघामध्ये कोणत्याही परिस्थितीत निधीच्या कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही काल सौ जोल्ले यांनी दिली.
निपाणी वार्ड क्रमांक 31 येथे 86 लाख 76 हजार रुपयांच्या निधी मधून विविध विकास कामांचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. प्रारंभी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. या निधीमधून रस्ता, गटार, एरिया सुशोभीकरणासाठी खर्च केला जाणार आहे. कार्यक्रमाचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते महादेव मोरे यांनी केले तर प्रास्ताविक अजित पवार यांनी केले.
पुढे बोलताना जोल्ले म्हणाल्या येणाऱ्या काळामध्ये आपण निपाणीच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून या स्लम एरिया साठी आपण निधी कमी पडू देणार नसल्याची उपस्थितांना ग्वाही दिली.
नगराध्यक्षा सोनल कोठडीया म्हणाल्या आमदार जोल्ले यांनी कोणतीही जात,पात धर्म,भाषा व वार्ड असा भेदभाव न करता निष्पक्षपणे सर्व वार्डात विकास कामांना चालना दिली असल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर म्हणाले आमदार सौ शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विकासात्मक धोरण राबवून या भागाचा विकास व्हावा यासाठी सत्ता स्थापन करून पाठिंबा दर्शवला होता. आमदार जोल्लेच्या प्रयत्नातून 86 लाख रुपये निधीतून आपल्या वार्डामध्ये विविध विकास कामे होणार असून येणाऱ्या काळामध्ये स्लम एरियासाठी एक कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देऊन उर्वरित सर्व कामे करण्या विषयी आमदार जोल्ले यांना विनंती केली.
यावेळी या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सागांवकर, सभापती डॉ जसराज गिरे, नगरसेविका सुनिता गाडीवड्डर, सुजाता कदम, बाळासाहेब देसाई सरकार, नीता बागडे, कावेरी मिरजे, डॉ. अजित चव्हाण विजय टवळे, राजू गुंदेशा, दत्तात्रय जोत्रे, सागर मिरजे, मुस्ताक शिरकोळी, प्रकाश नलवडे, राजेश कोठडिया, प्रणव मानवी, सुनील पाटील, सुजाता कदम, मेहबूब तहशिलदार, संजय माने, हसन मकानदार, गौस शेखजी, परविन पठाण, जरीना चाऊस, अभिनंदन मुदकुडे, यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार महादेव मोरे यांनी मानले.