लखनापूरात युवकाची गळफासाने आत्महत्या!
संदीप मारुती भोसले वय 28 राहणार लखनापूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे!

निपाणी नगरी प्रतिनिधी ( 8)
लखनापूर तालुका निपाणी येथे युवकाने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. संदीप मारुती भोसले वय 28 राहणार लखनापूर तालुका निपाणी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत बसवेश्वर चौक पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की मृत संदीप याला काही दिवसापासून दारूचे व्यसन जडले होते. त्यांनी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास राहता घरी गळफास लावून घेतला. त्यांच्या घरची मंडळी दुसऱ्या घरात होती.
सदर घटनेची माहिती निपाणीतील बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाला देण्यात आली त्यानुसार बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार हवालदार प्रशांत गुजरी यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. सदर घटने संदर्भात मृत संदीप याचा भाऊ अजित मारुती भोसले यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे
घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत संदीप अविवाहित होता त्याच्या पश्चात आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. या घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे