ताज्या घडामोडी

पाच दिवसांच्या घरगुती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप

लोणावळा : पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे काल उत्साहात विसर्जन करण्यात आले. माहेरवाशिण गौरी बरोबर गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

यंदाच्या वर्षीही कोरोना महामारी मुळे विसर्जन मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही भक्तांमध्ये उत्साह होता. पाच दिवस गणपती व गौरीचे मनोभावे पूजन केल्यानंतर शहरातील नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात तसेच वलवण डॅम, लोणावळा डॅम येथे भक्तीमयरित्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनासाठी लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जीव रक्षक पथकेही स्थापन करण्यात आली होती.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!