निपाणी नगरी वृत्तसेवा (25)
श्री पार्श्वमती विद्यालय, अक्कोळ येथे गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट यांच्या वतीने सनातन संस्था निर्मित संस्कार वही सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत वाटप करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, चांगले संस्कार आणि भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे अधिकारी श्री सुनील वाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व, संस्कारांचे मूल्य, आदर्श जीवनपद्धती, विद्यार्थीदशेतील शिस्त, चारित्र्य संवर्धन तसेच समाजहितासाठी सजग नागरिक बनण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून कार्यक्रमाचा लाभ घेतला.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संस्कार वहीचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे, शिक्षक व्ही. डी. इंदलकर, टी. ए. घोसरवाडे, पी. बी. कळंत्रे, एस. डी. खोत, डी. ए. देसाई, एस. बी. मगदूम, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट व सनातन संस्थेचे आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.