निपाणी नगरी वृत्तसेवा..(13)
श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम आणि शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी येथे आठवडी बाजार उत्साहात संपन्न
श्री निकेतन कन्नड व मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल या शाळेमध्ये मुलांच्या गुणवत्ते मध्ये भर पडावी शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे आकलन घ्यावे यासाठी शाळेमध्ये आठवडी बाजार हा उपक्रम राबवण्यात आला. या आठवडी बाजारासाठी श्री.निकेतन हायस्कूलचे चेअरमन श्री कपूरचंद इंगळे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले श्री. निकेतन शाळेचे चेअरमन डॉ. अनिल ससे शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बी कुरबेट्टी मुख्याध्यापिकासो अलका भोसले सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालकवर्ग यांची उपस्थिती होती.
या आठवडी बाजारामध्ये नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये यासारख्या पदार्थाची विक्री केली तसेच आठवडी बाजारामध्ये विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते.
या बाजारामध्ये पालक शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या कडे असणाऱ्या हिरव्या पालेभाज्या तसेच वस्तू कडधान्य खरेदी करून मुलांचा आनंद द्विगुणित केला या मुलांच्या आठवणी बाजारामध्ये शिक्कानगर मधील नागरिकांनी बाजार खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती त्यामुळे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता.