निपाणी नगरी वृत्तसेवा..(18)
हुक्केरी तालुक्यात मत्तिवडे हे छोटेशे गांव आहे, या गांवात अनेक समाजाचे लोक एकञीतपणे गुण्या गोविंदानं राहतात, त्यातच गांवात *पाटील व पाहुणे परिवार* हा समाज थोडा मोठा आहे. या परीवाराने नुकतेच आपल्या समाजासाठी स्मशान भुमीचे बांधकाम केले ते पण या परिवारातील प्रत्येकी म्हणजे फुटउंबरा तब्वल सात ते आठ लाख रुपयांची वर्गणी जमा करुन व एकमेकांच्या श्रमदानातुन भव्य दिव्य अशा स्मशान भुमीचे काम पुर्ण केले. आणि त्याला “वैकुंठ भुमी” असे नांव देण्यात आले. नवल म्हणजे या समाजात सांप्रदायीक क्षेञात जास्त मंडळी असल्यामुळे या “वैकुंठभुमीत” कीर्तनाचा कार्यक्रम ठेवायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी जेष्ट किर्तनकार डॉ. ह.भ.प.श्री शिवाजी पन्हाळकर महाराज (कडगांव) यांना आशा ठिकाणी किर्तन करायचे आहे असे सांगितल्यानंतर त्यांनी पण लगेच होकार दाखविला. आणि दि.15 जाने. रोजी अशा ठिकाणी किर्तन झालं ज्याठिकाणी लोक जायला घाबरतात आणि ते पण एकदम उत्तमरित्या पार पाडले. त्यांच्याकडुन “गरुड पुराणावर सांप्रदायीक मार्गदर्शन” सर्वांना मिळालं व त्यांच्या नंतर सर्व ग्रामस्थांच्या साठी या परीवारा कडुन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
आज या परिवाराचे पुर्वज देखील ह्या वैकुंठभुमीची निर्मिती बघुन स्वर्गातुन आशिर्वादाचा वर्षाव करीत असतील. या परीवारामध्ये पाटील, शिंदे, ठिपकुर्ले, तवंदकर, देसाई, बेलवाडकर, दड्डेकर, मोरबाळे अशा समाजाचे सामाजीक बांधीलकी जपणारे लोक एकञीत व एकजुटपणा दाखवुन आपल्या पुर्वजांच्या पुण्याई व आशिर्वादामुळे हे नवल घडवुन पंचक्रोशीमध्ये या समाजाने एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. सर्वच स्तरावरुन ही “वैकुंठभुमी” व त्याठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे या पाटील व पाहुणे परिवाराचे कौतुक होत आहे.