निपाणी नगरी वृत्तसेवा..(19)
18 फेब्रुवारी 1991 रोजी स्थापन झालेल्या व 35 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या श्री महात्मा बसवेश्वर संस्थेच्या अध्यक्षपदी श्री किशोर बाली तर उपाध्यक्षपदी डॉ सी बी कुरबेट्टी यांची बिनविरोध निवड झाली.
सामाजिक बांधिलकी सह आर्थिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अवघ्या पस्तीस वर्षाच्या कालखंडात 600 कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवींची संकलन करत जनमानसात एक वेगळाच आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणून आज महात्मा बसवेश्वर संस्थेकडे पाहिले जाते. कारण आज त्यांच्या विस्तारलेल्या शाखा व संस्थेमध्ये असलेले एकमेकांचे सलोख्याचे संबंध व मार्गदर्शनाखाली होत असलेले अनेक समाज हिताचे निर्णय सर्वांसाठी अतिशय मोलाचे ठरत असून अवघ्या काही वर्षात एवढ्या मोठ्या ठेवी गोळा करणे अगदी अशक्यप्राय आहे. व याचे सर्व श्रेय मी सर्व संचालक मंडळ, होतकरू कर्मचारी वर्ग, सुजाण सभासद व हितचिंतकांना जाते असे मत काल सहकाररत्न संस्थापक चेअरमन विद्यमान उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कुरबेट्टी यांनी व्यक्त केले.
ते काल सहकार खात्याचे निबंधक एस एम आप्पाजीगोळ निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या व बिनविरोध झालेल्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्यावेळी संस्था चालू केली. त्यावेळी सहकार्य केलेल्या व अजून देखील सहकार्य मिळत असणाऱ्या सर्व आजी-माजी संचालकांच्या सहकार्याने आम्ही एवढी उत्तुंग झेप घेत असून इथून पुढे देखील आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवत समाज हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहणार असून आज आपली संस्था सर्व दृष्टीने अद्यावत करण्याकडे आमचा कल असल्याचे सांगितले.
नूतन अध्यक्ष किशोर बाली म्हणाले सर्व संचालक मंडळाने जो काही विश्वास दाखवून माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. ती त्यांच्या सहकार्याने मी यशस्वी पार पाडून संस्था आणखीन यशोशिखरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत राहीन. त्यावेळी नूतन संचालक म्हणून राजेश पाटील यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक श्रीकांत परमणे, प्रताप पट्टणशेट्टी, डॉ. एस आर पाटील, सुरेश शेट्टी, महेश बागेवाडी,अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, सुरज घोडके महादेव बडगीर चंद्रकांत हंबर, राहुल घाटगे. दिलीप गायकवाड, एडवोकेट एस बी उत्तुरे, एडवोकेट शरद पाटील, यांच्यासह संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे सी.ई.ओ. शशिकांत आदन्नावर यांनी मानले.