निपाणी नगरी वृत्तसेवा..(21)
मराठा मंडळ बेळगाव संचालित मॉडर्न इंग्लिश स्कूल निपाणी येथे दि. 20 जानेवारी 2026 रोजी संशोधन विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी श्री. सुदर्शन संजय काबुगडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर विविध प्रकारचे व्हिडिओज दाखवून मार्गदर्शन केले. श्री काबुगडे हे स्वतः संशोधन विद्यार्थी म्हणून इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी विज्ञान म्हणजे काय?, विविध संशोधने, संशोधन म्हणजे काय, संशोधनाचे महत्त्व आणि उपयोग याबद्दल माहिती दिली.
तसेच भारतातील संशोधक व त्यांची संशोधने परदेशातील संशोधक व त्यांची संशोधने याबद्दलही माहिती दिली. ते करत असलेल्या सोलार एनर्जी वरील संशोधनाचा व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा आर घाटगे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री कबुगडे यांचा सत्कार केला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजू तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा आर घाटगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेची विद्यार्थिनी कु. रंजना लोहार हिने उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.