निपाणी नगरी वृत्तसेवा,,(22)
आज सकाळी वेळ 10 वाजून 55 मिनिटांची होती सरकारी नियमाप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी दहा ते दहा वाजून पाच मिनिटापर्यंत आपल्या कार्यालयातील बायोमेट्रिक मशीनवर आपली नोंद करून कार्यालयातील काम करण्याचे शासकीय निर्देश असून देखील हे सर्व नियम धाब्यावर बसवत…..
गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी निपाणी तालुका पंचायतमध्ये ‘वेळेची चोरी’ उघड झालेली असुन कार्यालयीन कर्मचारी ११ ला कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी लावतात, मात्र मस्टरवर १०.३० ची सही करून एक प्रकारे वेळेची चोरी करत प्रशासनाच्या तिजोरीवर अप्रत्यक्षपणे डल्ला मारत आहेत! कार्यालयात उशिरा येण्याची सवय, मस्टरवर मात्र वेळेवर नोंद; या प्रकारामुळे शासनाच्या वेळेचा आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. नियम पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून, कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांचा विश्वास प्रशासना वरून उडत चालला आहे. कर्मचाऱ्यांना व अधिकारी वर्गाला जर उशिरा येण्याचे कारण विचारल्यास तर ठरल्याप्रमाणे बँकेत गेलो होतो, पंचायतीला गेलो होतो, झेरॉक्सला गेलो होतो, ग्राम विजीट होती, मिटींगला गेलो होतो, अशी अनेक ठराविक व खोटी कारणे देऊन प्रशासनाला एक प्रकारे चुना लावत आहेत.
११ वाजता कार्यालयात येऊनही १०.३० ची हजेरी लावणे म्हणजे थेट वेळेची चोरी असून हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कारण कार्यालयात एकूण 17 ते 18 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा असून देखील आज गुरुवारी कार्यालयामध्ये फक्त चार ते पाच लोक हजर होते. वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय प्रमुख यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे की नेमके सर्व काही माहित असूनही डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे शासनाच्या वेळेचा आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत आहे. नियम पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून, कामासाठी आलेल्या सामान्य नागरिकांचा विश्वास प्रशासना वरून उडत चालला आहे.
निपाणी तालुका पंचायत कार्यालयातील हा बेजबाबदार कारभार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन, पंचायत राज विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी ठोस कारवाई करणार का? की नागरिकांनी सहनशीलतेची सीमा ओलांडल्या वरच हालचाल होणार? असा संतप्त सवाल आता सर्वत्र उपस्थित होत आहे.