निपाणी नगरी वृत्तसेवा..(23)
निपाणी तालुक्या मधील फुटाणवाडी (खडकलाट ) येथून दोन भावंडांची निकिता कापसे आणि स्वप्निल कापसे यांची बीएसएफ मध्ये निवड झाली. त्यामुळे लिटल एंजल स्कूलतर्फे सत्कार सोहळा आयोजित केला होता या सत्कार सोहळ्यात स्कूलचे चेअरमन प्रसन्नकुमार गुजर, सीमा गुजर , निकिता कापसे, स्वप्निल कापसे, सुनील कापसे, तात्यासाहेब कापसे, महेश मुसळे, रोहित कापसे स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमा दरम्यान त्या भावंडांचा सत्का शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रशालेतर्फे केला गेला.
सत्कार समारंभास संबंधित करताना गुजर म्हणाले की प्रत्येक मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे तरच त्यांचे ध्येय साध्य होतं. त्यानंतर सत्कारमूर्ती निकिता तात्यासाहेब कापसे म्हणाल्या की त्यांना लहान पासूनच आर्मी भरतीची आवड होती त्यामुळे त्या सतत प्रयत्न करत राहिल्या त्या स्वतः कशा पद्धतीने प्रयत्न करीत होत्या हे त्यांच्या मुलाखतीत सांगितले त्याच प्रकारे त्यांचे भाऊ स्वप्निल सुनील कापसे यांनी स्वतःला देश सेवेसाठी अर्पण केले तसेच त्यांनी आर्मी भरतीसाठी लागणारे कष्ट त्याच पद्धतीने ट्रेनिंग दरम्यान घेण्यात आलेली नियम बद्धता स्पष्ट केली.
स्कूलच्या मुख्याध्यापिका पूजा टेपूगडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आपले आयुष्य देश सेवेसाठी कशाप्रकारे सत्कारणी लावलं पाहिजे व त्यासाठी आपल्याला अगदी बालवयापासूनच ते स्वप्न पाहणे व त्या दृष्टीने मार्गक्रमण करणे अतिशय महत्त्वाचे असते असे सांगितले.