निपाणी नगरी वृत्तसेवा.(1)
राज्यात सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी गावोगावी योजना पोहोचविण्याचे कार्य स्थानिक लोकप्रतिनिधींचे असते. निपाणीत नगरोत्थान चौथ्या टप्प्यात ३ कोटी २७ लाखांच्या निधीतील विकासकामांमुळे निपाणीकरांना पायाभूत सुविधा मिळणार असून ही दिलासादायक बाब असल्याचे प्रतिपादन खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. रविवारी (ता. १) सायंकाळी विकासकामांचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार शशिकला होत्या. प्रथम फलक अनावरण व श्रीफळ वाढवून विकासकामांचे उद्घाटन झाले. आयुक्त गणपती पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर
आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘निपाणीत यापूर्वी नगरोत्थानमधून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. आता त्यातून रस्ते, गटारीसह अनेक कामे झाली आहेत.’ आता पुन्हा नगरोत्थानमधून हरीनगरसह विविध ठिकाणी 4 अंगणवाडी, साखरवाडीत स्वच्छतागृह, पावले गल्लीत दिव्यांग लोकांसाठी स्वच्छतागृह, मटण व फिश मार्केट, छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात एअरक्राफ्ट आवारात खाऊ कट्टा अशी विकासकामे होत आहेत. २०१३ मध्ये आमदार झाल्यावर आपण तालुक्यात अंगणवाडी निर्मितीसाठी सर्वेक्षण केले होत. त्यानुसार आपण सुचविलेल्या यादीनुसार अंगणवाडीला मंजुरी मिळत आहे.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, ‘जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार जारकीहोळी निपाणीत काही कमी पडू नये यावर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक आमदार जोल्ले यांनीही अनेक योजना निपाणीत राबविल्या आहेत. निपक्षपातीपणे विकास करण्याचे धोरण राज्यातील काँग्रेस सरकारने ठेवले आहे.
कार्यक्रमास शहर विकास प्राधीकरणचे अध्यक्ष निकू पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, राजेश कदम, सुजय पाटील, रोहन साळवे, जयवंत भाटले, सुनील पाटील, राजु गुंदेशा, नीता बागडे, आशा टवळे, सद्दाम नागारजी, अभि कासार, जुबेर बागवान, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, दत्ता जोत्रे, योगिता घोरपडे, असलम शिकलगार, संजय चव्हाण, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपत कुरणे यांनी सत्रूसंचालन केले. तर अभियंते श्री पठाण यांनी आभार मानले.