निपाणी नगरी वृत्तसेवा (28)
येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष कै. डी. व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लब व निकु पाटील परिवार तर्फे आयोजित पाचव्या पर्वातील डी. व्ही. पाटील स्मृती चषकावर निपाणीतील द्रोणा स्पोर्टस संघाने आपले नाव कोरले. या संघाला रोख 51 हजार रुपये आणि चषक देण्यात आला.
अर्जुननगर येथील एम.डी. विद्यालय मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. गुरुवारी (ता. 28) पाचगाव परमणे टेडर्स आणि निपाणीतील द्रोणा स्पोर्ट्स यांच्यात उपांत्य सामना झाला. चुरशीच्या या सामन्यात द्रोणा स्पोर्ट ने विजय मिळवला. त्यानंतर कुरली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोगनोळी स्पोर्ट्स क्लब यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. त्यामध्ये कुरली संघाने एकतर्फी विजय मिळविला. सायंकाळी द्रोणा स्पोर्ट्स निपाणी आणि कुरली स्पोर्ट्स संघात अंतिम सामना पार पडला. या संघात दोन सामने खेळविण्यात आले. कुर्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 37धावा केल्या. तर निपाणी संघाने 50 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात कुर्ली संघाने 42 धावा केल्या. निपाणीला 30 बॉलमध्ये 30 धावा गरज असताना दोन ओव्हरमध्ये 30 धावा करून दणदणीत विजय मिळविला.
उपविजेत्या कुरली संघाला रोख 25 हजार रुपये आणि चषक तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या पाचगाव परमने ट्रेडर्स व चतुर्थ कोगनोळी संघाला रोख 7 हजार 500 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. मालिकावीर सागर कमते कुरली, सामनावीर श्रेयस मातीवडर निपाणी, उत्कृष्ट संघ पाटील स्पोर्ट्स तमनाक वाडा, उत्कृष्ट झेल गणेश कांबळे कडगाव, शिस्तबद्ध खेळाडू रोहित खांडेकर कोडणी, उत्कृष्ट फलंदाज शुभम नागेश निपाणी, उत्कृष्ट गोलंदाज श्रेयस मातीवडर निपाणी या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. डॉ. डी.डी. हळवणकर यांनी स्पर्धेचे समालोचन केले.
यावेळी निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, अडवोकेट अशोक शिंदे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, पंकज पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, किरण कोकरे, किरण पाटोळे, विजय शेटके, रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, सागर पाटील, नितीन उपाळे, स्वप्निल पावले, रणजीत मगदूम, विनोद बल्लारी, कृष्णा कुंभार, सचिन काटकर, सुरेश घाटगे, रमेश भोईटे, पुंडलिक कुंभार यांच्यासह शेकडो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.