निपाणी नगरी वृत्तसेवा (26)
श्रीपेवाडी : अक्कोळ हायस्कूल, अक्कोळ येथील मैदानावर नुकत्याच संपन्न झालेल्या १४ वर्षांखालील अक्कोळ व श्रीपेवाडी सीआरसी क्लस्टर लेव्हल क्रीडा स्पर्धांमध्ये श्री जी. एम. संकपाळ हायस्कूल, श्रीपेवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर घातली. विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
प्रथम क्रमांक
१०० मीटर धावणे : कु. गिरिधर विलास माने
४०० मीटर धावणे : कु. वेदांत जाधव
६०० मीटर धावणे : कु. श्रेयस तोरसे
६०० मीटर धावणे : कु. कोमल पोवार
४×१०० मीटर रिले (मुलांचा संघ) : गिरिधर माने, संभव खाडे, श्रेयस तोरसे, वेदांत जाधव व अथर्व सांगावे.
खो-खो (मुलांचा संघ) : श्रेयस तोरसे (कर्णधार), संभव खाडे, वेदांत जाधव, गिरिधर माने, वैष्णव हरदारे, आयान दरवेशी, रोहित कांबळे, अतिश कोणकेरी, अथर्व सांगावे, विराज कोले व प्रेम हनिमनाळे.
खो-खो (मुलींचा संघ) : नम्रता तोरसे (कर्णधार), कोमल पोवार, किर्ती पाटील, प्रणिता खोत, भाग्यश्री गळतगे, स्नेहल बेनाडे, श्रद्धा भोगले, श्रद्धा चौगुले, बुद्ध श्री कांबळे, जान्हवी पाटील, आयुषा हजारे व श्रावणी झुल्पे.
द्वितीय क्रमांक
२०० मीटर धावणे : कु. संभव खाडे
४०० मीटर धावणे : कु. वैष्णव हरदारे
लांब उडी : कु. दुर्वा पाटील
कबड्डी (मुलांचा संघ) : पृथ्वीराज जाधव (कर्णधार), अथर्व शेळके, संचित कुन्नरे, साहिल चव्हाण, प्रज्वल गाडीवड्डर, आयुष गाडीवड्डर, स्वयम भिलगुडे व शितल चौगुले.
तृतीय क्रमांक
१०० मीटर धावणे : कु. संभव खाडे
१०० मीटर धावणे : कु. दुर्वा पाटील
६०० मीटर धावणे : कु. श्रावणी झुल्पे
लांब उडी : कु. अथर्व सांगावे
गोळाफेक : कु. यश जबडे
४×१०० मीटर रिले (मुलींचा संघ) : कोमल पोवार, स्नेहल बेनाडे, श्रावणी झुल्पे व दुर्वा पाटील.
या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे चेअरमन डॉ. ए. पी. पुजारी, व्हाईस चेअरमन श्री. अविनाश पाटील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ व ट्रस्टी मेंबर्स, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. जाधव व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. डी. पवार यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
क्रीडा मार्गदर्शक बी. एच. पाटील, सी. एस. पाटील, संघ व्यवस्थापक ए. आर. झिनगे, सौ. आर. आर. बाकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा व संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.