निपाणी नगरी वृत्तसेवा (23) पांगिरे(बी) प्रतिनिधी
पांगिरे (बी) तालुका निपाणी येथे आज परंपरेनुसार श्री दत्तगुरू उत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. श्री वसंत पंचमी शके 1947 निमित्त शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 ते शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचे आयोजन पांगिरे (बी) येथील श्री पंत सांप्रदाय मंडळ, श्री दत्तभक्त तरुण मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ व भक्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी ओम नमः शिवाय या भजनाने उत्सवाची सुरुवात होणार असून सकाळी एकतारी पूजन, प्रेमळ भजन व मिरवणूक कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 वाजता प. पू. डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्रीकर,अकोळ यांच्या अमृतहस्ते प्रेम ध्वजारोहण होऊन दत्तोत्सवास प्रारंभ होणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता बोधपीठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सौ. सीमाताई कुलकर्णी, निपाणी, श्री. भिमराव तिप्पे हासूर तसेच श्री. ज्ञानदेव पुंगावकर, कोल्हापूर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी मंदिरात उत्सव मूर्तीचे आगमन व आरती होणार असून रात्री विविध गावातील भजनी मंडळांचा भजन जागर आयोजित करण्यात आला आहे. लिंगनूर, कौलगे, बेनिक्रे, हणबरवाडी, गोंदीकुप्पी, बुदलमुख, अर्जुनी,बाळेघोळ, हमिदवाडा, शिरगुपी, शेंद्री, तमणाकवाडा, निपाणी या भागातील भजनी मंडळे या भजन जागरात सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 8.15 वाजता श्री पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून यामध्ये पाळखी सोबत अर्जुनी, लिंगनूर, बाळेघोळ, रासाई डोंगर, कुरकुली, आवळी, बोळावी, बोळाईवाडी, निपाणी व पांगिरे (बी) येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता प. पू. डॉ. संजय अरुण पंतबाळेकुंद्रीकर यांच्या अमृतहस्ते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते 9 या वेळेत प्रेमानंद टिपरी तर रात्री 9 वाजता श्री अष्टविनायक सोंगी भजनी मंडळ, ढोणेवाडी यांचा भजन कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्त मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजन, पूजन व सेवेमध्ये सहभाग घ्यावा व दत्तगुरू उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन श्री पंत सांप्रदाय मंडळ, श्री दत्तभक्त तरुण मंडळ, सौ. यमुनाक्का महिला मंडळ व समस्त ग्रामस्थ भक्त मंडळ पांगिरे बी यांच्या वतीने करण्यात आले आहे.