निपाणी नगरी वृत्तसेवा..(28)अर्जुननगर,
“कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आपल्याला आपल्या मातृभाषेची जाणीव करून देतो. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि इतिहासाची ओळख आहे. आईच्या अंगाई गीतापासून ते संतांच्या अभंगा पर्यंत मराठी भाषेत आपल्या भावनांचे विश्व दडलेले आहे.ज्ञान, साहित्य, समाजप्रबोधन आणि विचारांची देवाणघेवाण यासाठी मराठीने नेहमीच भक्कम पाया दिला आहे.डिजिटल युगातही मराठीचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे.आपली भाषा जपली तरच आपली ओळख टिकेल. चला, मराठी भाषा दिनानिमित्त मराठीचा अभिमान बाळगू आणि तिचा सन्मान राखू.”
येथील मोहनलाल दोशी विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका एस.एम.गोडबोले यांच्या तर ग्रंथपूजन आर डी देसाई यांच्या हस्ते झाले. त्यांनतर व्ही आर पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या मनोगतातून,गीत गायनातून मराठी भाषेची थोरवी गायली व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक आर. डी.पाटील,आर एस भोसले,आर डी देसाई शिक्षकप्रतिनिधी एस एम चौगुले,कर्मचारी प्रतिनिधी ए आर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन जे खेबुडे यांनी तर आभार प्रदर्शन एस.एस.सांडगे यांनी केले यावेळी सर्वांनी मराठी भाषा जतन करण्या बाबतची शपथ घेतली
याप्रसंगी सर्व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह यांच्यासह सर्व संचालकांचे प्रोत्साहन लाभले.