निपाणी नगरी वृत्तसेवा,,(13)
सोमवार दिनांक 12.01.2026 रोजी मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशाने मा. निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांच्या भरारी पथकाने अथणी शुगर भुदरगड युनिट येथे दोन्ही ऊस वजन काट्याची तपासणी करण्यासाठी सकाळी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काट्याची संपूर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पूर्वी वजन केलेल्या व नवीन वाहनांची वजने घेतली तसेच दहा टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून तपासणी केली. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही त्यामुळे अथनी शुगर भुदरगड युनिट या साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला. अथनी शुगर भुदरगड युनिट हा साखर कारखाना भुदरगड तालुक्याच्या ग्रामीण भागात एकमेव साखर कारखाना आहे या कारखान्याच्या वजन काट्या बाबत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांमध्ये नेहमीच विश्वासार्हता आहे सदर तपासणी मुळे ती विश्वासार्हता पुन्हा वृद्धिंगत झाली आहे.
भरारी पथकाचे अधिकारी श्री एस पी पोवार, मंडल अधिकारी (तहसीलदार भुदरगड प्रतिनिधी) एस एम खाडे निरीक्षक वैद्य मापन शास्त्र, बी एन खाडे लेखा परीक्षेत श्रेणी 1, एम जी पोवार (पोलीस निरीक्षक भुदरगड प्रतिनिधी) विलास शामराव पाटील व रंगराव लहू पाटील शेतकरी प्रतिनिधी यांनी कारखाना चीफ इंजिनिअर नामदेव भोसले व केन यार्ड सुपरवायजर प्रकाश देसाई यांचे समक्ष काट्याची तपासणी केली.
यावेळी कारखान्यातील सर्व अधिकारी, ऊस पुरवठादार शेतकरी, केन यार्डचे सर्व कर्मचारी, वाहन मालक, चालक प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते. तसेच 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतचे ऊस बिल सदर ऊस उत्पादकांच्या नावावर बँकेत लवकरच जमा केली जातील. व या यापुढे पण ऊस बिले वेळेवर जमा होतील तरी सर्व ऊस उत्पादकांनी आपला ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.