निपाणी नगरी वृत्तसेवा..(20)
नारायणपूर (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या 20 वर्षाखालील मुलांच्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत देवचंद महाविद्यालयाचा खेळाडू श्री. आदित्य अनिल दिवटे याने 87 किलो वजनी गटात कास्यपदक पटकावले. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.
विजयी खेळाडूला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह, खजिनदार श्री सुबोधभाई शाह, महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी .डी.इंगळे , IQAC प्रमुख डॉ. पी.डी. शिरगावे यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच जिमखाना प्रमुख डॉ. रवींद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक श्री. निरंजन जाधव, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक श्री. दादासो लवटे, श्री.अनिल दिवटे, जिमखाना कर्मचारी श्री. वैभव सोनार व श्री. शिवदास चव्हाण श्री. आनंत घोळवे यांचे मार्गदर्शन लाभले.