निपाणी नगरी वृत्तसेवा (7)
श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्री निकेतन कन्नड मराठी माध्यम शाळा तसेच शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल निपाणी आयोजित परमपूज्य गुरुदेव श्री 108 संमतभद्र महाराज 135 व्या जयंतीनिमित्त कै.कुमोदीनी अण्णासाहेब चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी स्तवनिधी गुरुकुलचे संचालक श्री महावीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .हायस्कूलचे चेअरमन कपूरचंद इंगळे, शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले, शाळेचे चेअरमन डॉ. अनिल ससे, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सी बी कुरबेट्टी, शाळेचे सेक्रेटरी श्री प्रदीप पाटील स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ जे डी कोरडे स्तवनिधी हायस्कूलचे श्री सुनील कांबळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अलका भोसले सर्व शिक्षक वृंद पालक मार्गदर्शक शिक्षक स्पर्धक विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ही स्पर्धा दोन विभागांमध्ये घेण्यात आली प्राथमिक विभागामध्ये प्रथम क्रमांक. रिद्धी रामदास सूर्यवंशी एम एच पी एस स्कूल सौंदलगा द्वितीय क्रमांक शरण्य पल्लवी निलेश जाधव एम टी ई मराठी स्कूल सांगली तृतीय क्रमांक देवराज सुरेश पाटील मोहनलाल जोशी विद्यालय अर्जुन नगर यांनी पटकावला. तर
माध्यमिक विभाग मधून प्रथम क्रमांक समीक्षा सोमनाथ चौगुले कन्याशाळा निपाणी द्वितीय क्रमांक तजिला रियाज नायकवडी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी तृतीय क्रमांक श्रेया निलेश कुमार मगदूम शांतिनिकेतन हायस्कूल निपाणी
या स्पर्धेची सर्व बक्षिसे शाळेचे ट्रस्टी श्री मिलिंद चौगुले यांनी दिली. अध्यक्षीय भाषणामध्ये श्री महावीर पाटील यांनी सध्याच्या परिस्थिती मध्ये मुलांनी आपल्या पालकांच्या सोबत कशा पद्धतीने राहिलं पाहिजे उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अलका भोसले यांनी केले या स्पर्धेचे सूत्रसंचालन या स्पर्धेचे कार्यवाहक श्री जितेंद्र कांबळे यांनी केले.