निपाणी नगरी वृत्तसेवा..(1)
“महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित निपाणी प्रधान शाखेचा 36वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. सहकार, एकीचे बळ आणि 1000 कोटी ठेवींचे ध्येय; संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख वाखाणण्याजोगे आहे सहकार्याची ताकद, एकीचे बळ आणि विश्वासाचा पाया यावर उभी असलेली ही संस्था आज सीमाभागात नावलौकिक मिळवत यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असल्याचे चित्र या वर्धापन दिन सोहळ्यातून स्पष्ट झाले.”
निपाणी येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित निपाणी शाखे चा 36वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संचालक मंडळ, मान्यवर, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बसव मुर्ती व सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व ज्ञात-अज्ञातांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. प्रमुख उपस्थित वीरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन किशोर बाळी यांनी संस्थेच्या स्थापने पासूनच्या प्रवासाचा आढावा घेत सहकार चळवळीतील संस्थेचे योगदान अधोरेखित केले.
कार्यक्रमात निपाणी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री राजू गुंदेशा यांचे तर अमर बागेवाडी यांची केली संस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल व सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांच्या कन्या ओमकारेश्वरी सुनील पाटील हिने चार्टर्ड अकाउंट परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले.
वर्धापन तीन कार्यक्रमास मार्गदर्शन करताना सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. सी. बी. कुरबेट्टी यांनी सांगितले की, “सध्या संस्थेच्या 36 शाखा यशस्वीपणे आर्थिक व्यवहार करीत आहेत. 650 कोटी ठेवींचा भक्कम टप्पा गाठल्यानंतर आता 1000 कोटींचे उद्दिष्ट आपल्या समोर आहे. सभासदांचा विश्वास आणि व्यवहारांची वाढ हीच संस्थेची खरी ताकद आहे.” त्यांनी कर्नाटकात 100 शाखा सुरू करण्याचे ध्येयही व्यक्त केले.
सी.ई.ओ शशिकांत आदन्रावर यांनी संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख सादर करत पारदर्शक कारभार, सुयोग्य आर्थिक नियोजन व ग्राहकाभिमुख सेवा यामुळे संस्था सातत्याने विस्तारत असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते सुनील शेट्ये यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर आधारित बँकिंग प्रणालीचे विवेचन करत डिजिटल व्यवहार, जोखीम विश्लेषण, जलद कर्ज प्रक्रिया व सुरक्षित व्यवहार प्रणालीमुळे भविष्यात बँकिंग अधिक सक्षम व पारदर्शक होणार असल्याचे स्पष्ट केले.
आपल्या आशीर्वचनात स्वामीजी म्हणाले, “सहकार ही समाजाला जोडणारी शक्ती आहे. एकीच्या बळावरच संस्था टिकते आणि वाढते. विश्वास, निष्ठा आणि पारदर्शकता हेच खरे भांडवल आहे. संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि प्रामाणिकपणा संस्थेच्या यशाचा पाया आहे. समाजहित जपणारी प्रत्येक कृती हीच ईश्वरसेवा आहे. ही प्रगती अशीच अखंडित राहो.”
कार्यक्रमास प्रताप पट्टणशेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, पुष्पा कुरबेटी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी यांच्यासह सर्व शाखांचे चेअरमन, संचालक मंडळ, सभासद, हितचिंतक कर्जदार,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुजाता जाधव व राजेंद्र मगदूम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज घोडके यांनी मानले.