निपाणी नगरी वृत्तसेवा (5)
मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा घाटगे उपस्थित होत्या. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या शाळेच्या शेतकरी पालकांना प्रमुख पाहुणे म्हणून शाळेमध्ये आमंत्रित करण्यात आले. यामध्ये श्री. समरजीत निंबाळकर, श्री. बाळकृष्ण पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. हरी कागले, सौ. सुशीला कागले व श्री. संजय खराडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नववीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. सर्व शेतकरी पाहुण्यांनी पर्यावरण आणि त्याचे संवर्धन या विषयावर माहिती दिली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा घाटगे यांनी सर्व शेतकरी बांधवांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे विद्यार्थी कु. श्लोक मलाबादे व गौरांग घोटणे यांनी केले. सर्व पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. राजश्री नागराजू यांचे मार्गदर्शन लाभले.